श्री कृष्णकांत गुरुजी हे पारंपरिक वैदिक गुरुकुल शिक्षण आणि आधुनिक उच्च शिक्षणाचा अनोखा संगम साधणारे ज्योतिषाचार्य आणि वास्तुशास्त्रज्ञ आहेत. बालपणापासूनच त्यांनी देवाची आळंदी आणि परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी ढालेगाव येथे ८ वर्षांचा गुरुकुल शिक्षणाचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा पाया मजबूत झाला. उच्च शिक्षणासाठी त्यांनी टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए. (योग) पूर्ण केले, तसेच कवी कुलगुरू रामटेक विद्यापीठातून ज्योतिष शास्त्र व वास्तुशास्त्राचा अभ्यास केला.
गुरुजींनी पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दुबईसारख्या शहरांमध्ये पारंपरिक पौरोहित्य सेवा उत्कृष्ट रीतीने पार पाडल्या आहेत. मागील १२ वर्षांपासून ते पुणे शहरात ज्योतिष व वास्तुशास्त्र या विषयांमध्ये हजारो लोकांना वैयक्तिक मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक लोकांना जीवनातील अडचणी सोडवता येतात, सुख, समृद्धी, यश आणि मानसिक समाधान प्राप्त होते.
त्यांच्या सेवेत वैयक्तिक व व्यावसायिक ज्योतिष सल्ला, वास्तु मार्गदर्शन, कुंडली विश्लेषण, विवाह व गृहप्रवेश पूजेसारखे पारंपरिक विधी, तसेच धार्मिक व योग मार्गदर्शन यांचा समावेश आहे. गुरुजींचे उद्दिष्ट आहे की, परंपरेचा सन्मान राखत आधुनिक समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी व मानसिक शांतता निर्माण करणे.
आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या जीवनातील संधी, आव्हाने आणि यशाचा मार्ग स्पष्ट करतो. योग्य ग्रहस्थिती आणि दृष्टींचा सखोल अभ्यास करून योग्य मार्गदर्शन दिले जाते.


घर, ऑफिस किंवा दुकानासाठी योग्य दिशानुसार वास्तू सल्ला दिला जातो. यामुळे आर्थिक प्रगती, आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते.


आपल्या ग्रहस्थितीनुसार योग्य रत्न व उपाय सुचवले जातात. योग्य रत्न धारण केल्याने आरोग्य, आत्मविश्वास आणि यश वाढते.


आपल्या आयुष्यातील समस्या, यशातील अडथळे किंवा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आम्ही वैयक्तिक सल्ला, उपाय आणि मार्गदर्शन देतो. आमचा अनुभव आणि श्रद्धा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील.
Learn Moreजन्मकुंडली, ग्रहदशा आणि गोचरांवर आधारित अचूक भविष्यवाणी व उपाय.
घर, दुकान किंवा ऑफिससाठी शुभ दिशा आणि ऊर्जेचे संतुलन साधणारे उपाय.
ग्रहशांतीसाठी योग्य रत्नांची निवड आणि धारणा मार्गदर्शन.
दोषनिवारण, ग्रहशांती, लक्ष्मीकुबेर पूजा आणि विशेष यज्ञ आयोजन.